मा. मनोज जरांगे पाटील यांच्या इस्लामपूर येथील सभेसाठी पार्किंग नियोजन सभा स्थळ – खुले नाट्यगृह इस्लामपूर
सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007 93 2121
पार्किंग नियोजन
सभा स्थळ – खुले नाट्यगृह इस्लामपूर
सर्वांना नम्र निवेदन….
मा. मनोज जरांगे पाटील यांच्या इस्लामपूर येथील सभेसाठी वाळवा,शिराळा ,पलूस तालुक्यातून येणाऱ्या सर्व वाहनधारकांसाठी खालील प्रमाणे पार्किंगचे नियोजन करण्यात आलेले आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी या पार्किंग मध्येच आपली वाहने शिस्तबद्धरीत्या पार्किंग करून सभा ठिकाणी येण्याचे सहकार्य करावे.
१) पेठ नाका कडून येणाऱ्या सर्व वाहनांच्यासाठी पार्किंग- ख्रिश्चन बंगला परिसर
२) कासेगांव,नेर्ले,कापूसखेड मार्गे येणाऱ्या सर्व वाहनांच्यासाठी पार्किंग- सद्गुरूआश्रम शाळा व विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल सरकारी दवाखान्याशेजारी कापूसखेड नाका.
३)कामेरी कडून येणाऱ्या सर्व वाहनांच्यासाठी पार्किंग- जयहिंद टॉकीजच्या शेजारील गुरव यांच्या जागेत.
४)आष्टा व वाळवा कडून येणाऱ्या सर्व वाहनांच्यासाठी पार्किंग- शाळा नंबर एक समोर तालुका क्रीडांगण.
५) पलूस,ताकारी व बहे रोड वरून येणाऱ्या सर्व वाहनांच्यासाठी पार्किंग- इस्लामपूर हायस्कूलचे ग्राउंड व राजेबागेश्वर मंदिर परिसर व मंदिराच्या समोरचा परिसर.
तरी सर्वं समाजबांधवांनी वरील पार्किंग नुसार आपली वाहने पार्किंग करून शिस्तबद्ध रीतीने सभेच्या ठिकाणी यावे व आपली सभा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे…
धन्यवाद…
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा वाळवा शिराळा व पलूस तालुका