पालघर सफाळे गिराळे गावाच्या हद्दीत ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात विरार येथील दोन जणांचा जागीच मृत्यू
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे गिराळे गावाचा हद्दीत ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात मोटर सायकलवर बसलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्या प्रकरणी या बेजबाबदार ट्रक चालकावर सफाळे पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
विरार मनवेल पाडा येथील प्रशांत महादेव अडसूळ व मंगेश मनोहर मेस्त्री हे दोघेजण एम-एच-48 एएल-1977 या मोटर सायकलने गुरुवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता सफाळे येथून वसई फाटा येथे जात असताना समोरच्या दिशेने वसई येथून येणाऱ्या एम-एच 48-एवाय 8744 ट्रक चालक मोहम्मद मुराद जमाल वय वर्ष (46) राहणार अधिकारी आरएमसी प्लांट नागझरी बोईसर यांनी या दोन मोटरसायकल स्वारांना निराळे गावाच्या हद्दीतील डांबरी रोडवर जबरी ठोकर दिल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला .
याप्रकरणी सफाळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी या ट्रकचे चालक मोहम्मद मुराद जमाल यांच्यावर शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सफाळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील करत आहेत.