करमाळा तालुक्यातील नारायण आबा पाटील मित्र मंडळ शाखांची पुनर्बांधणी करणार,,,, प्राध्यापक अर्जुनराव सरक
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील नारायण (आबा) पाटील मित्रमंडळ शाखांची पुनर्बांधणी करणार असून युवकांना यात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुन सरक यांनी दिली. याबाबत अधिक सविस्तरपणे बोलताना त्यांनी सांगितले की सन २००० पासून करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या.
या शाखांच्या जोरावर व माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील अनेक निवडणुका मध्ये पाटील गटास यश मिळाले. अगदी सुरुवाती पासून ह्या शाखांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न अविरतपणे केला गेला.यामुळेच पुढे या शाखेतील सदस्यांना ज्या त्या गावात जनतेने गावगाड्यात निवडून देण्यास सुरुवात केली.याचा फायदा पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी झाला.
आता सन २०२४ ची विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून या शाखामध्ये युवकांचा मोठ्या संख्येने समावेश करून पाटील गटाची क्रयशक्ती वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच पंचायत समिती गणानुसार गावांचा आढावा घेऊन शाखा पुनर्बांधीसाठी कार्यवाही सुरू होणार असल्याचेही प्रा अर्जुन सरक यांनी सांगितले. तसेच पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा फार मोठी फळी आता तालुक्याच्या राजकारणात गावोगाव सक्रीय होताना दिसून येत आहे. यामुळे या युवाशक्तीला समाजकारण व राजकारण यासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठीच आता पाऊल उचलले जाणार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.