माळीनगर पाणीपुरवठा योजनेची पाहणी करताना आ रणजितसिंह मोहिते पाटील
प्रतिनिधी… रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क 9921500780
माळीनगर ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनल सत्तेत येताच विकास कामांना गती देण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माळीनगर येथील पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली होती यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी माने साहेब, माळीनगरचे ग्रामविकास अधिकारी शिंदे साहेब, यांच्याशी पाणीपुरवठ्या ठिकाणी जागेवरती जाऊन स्वतः पाहणी करत सखोल चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले
तसेच सलग 2 दिवस बैठका घेण्यात आल्या पाणीपुरवठा योजना, ग्रामीण मार्ग रस्ते सुधारणा, रमा माता कॉलनी मधील जागे संदर्भात प्रांतअधिकाऱ्यां सोबत तातडीची मीटिंग बोलवण्यात आली आहे. तसेच विविध विकास कामावर सखोल चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी माळीनगर परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख सुभाषदादा निंबाळकर, समिरदादा पांढरे, हेमंत रासकर, कल्पेश पांढरे,अनिल लोंढे, कांतीलाल एकतपुरे, ज्ञानेश्वर थोरात, मोहन लोंढे, रोहिदास सोनवणे, अविनाश माने, सोमनाथ कांबळे, राजाभाऊ दुरणे, हनुमंत पवार, अनिल एकतपुरे,
माळीनगर चे नूतन सरपंच अनुपमा अनिल एकतपुरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.