महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी एक डिसेंबर पासून मराठी बांधवांनी साखळी उपोषणाची तयारी ठेवावी, शेकोटीच्या जाळासमोर बसून मराठा आंदोलन आरक्षणासाठी लढा देत आहे हे पहिल्यांदाच वांगीत पाहिले,,,,, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील

जेऊर प्रतिनिधी अलीम शेख

मराठा आरक्षणासाठी आमचा लढा हा चालूच राहणार असून येत्या एक डिसेंबर पासून मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणासाठी तयारी करावी असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वांगी येथे बोलताना आपले मत व्यक्त केले

करमाळा तालुक्यातील वांगीची सभा ही शेकोटी करून केलेली सभा मी आयुष्यात कधीही पहिली नाही व ही सभा मी कधीच विसरू शकत नाही शेकोटीचा जाळ लावून त्या जाळासमोर आरक्षणासाठी लढा देत आहेत हे मी पहिल्यांदाच पाहिले आहे त्यामुळे आता माघार नाही असे मत मराठा आंदोलन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वांगी नंबर एक तालुका करमाळा येथे झालेल्या सभेत दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आपले मत बोलताना व्यक्त केले

याबाबत पुढे बोलताना श्री जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला यायला उशीर झाला परंतु प्रत्येक गावात लोक अडवायला लागले प्रत्येक गाव अडवतोय हे तुम्ही टीव्ही चॅनलला पाहिले असेल प्रत्यक्षात आमच्या गाडीला मराठा बांधव आडवा झोपत होता त्यामुळे तुमच्यापर्यंत यायला आम्हाला उशीर झाला परंतु कितीही उशीर झाला तरी आम्ही सभेला येऊ असा शब्द दिला होता सभेला किती लोक आहेत हे पहात नाहीत गर्दी झाली तर सभा झाली असे नाही याची मला खात्री आहे शेकोटी करून केलेली सभा ही मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आहे आता हा लढा थांबता कामा नये असे त्यांनी यावेळी बोलताना आपले मत व्यक्त केले

वांगी नंबर एक येथे सकल मराठा समाजाचे वतीने 171 एकरावर सभेचे भव्यदिव्य नियोजन करण्यात आले होते आलेल्या लोकांना 35000 पाणी बॉटल ची वाटप तसेच लाडू चिवड्याचे पाकीटही लोकांना देण्याची व्यवस्था करण्यात आली होती 35 एकर वर भव्य वाहनासाठी वाहनाची पार्किंगची सोय करण्यात आली असून जागोजागी गावापासून पास किलोमीटरच्या परिसरात भगवे झेंडे लाईटची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे चे व्यवस्था करण्यात आली होती

यास सभा शांततेत पार पाडण्यासाठी करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी पोलीस प्रशासनाचा वतीने चूक बंदोबस्त ठेवला होता मराठा आरक्षणासाठी सदरचा आमचा हा लढा अविरतपणे चालू असून येथे एक डिसेंबर पासून मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणासाठी तयारी ठेवावी असेही जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले

मराठा आरक्षणाच्या या सभा नियोजनामध्ये सकल मराठा जातीबरोबरच सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहकार्य करून सभा नियोजनाच्या ठिकाणी परिश्रम घेऊन आपले योगदान दिले आहे याप्रसंगी हजारो मराठा बांधव या मैदानावर रात्रीच्या थंडीत उपस्थित होते सदरची सभा व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी सकल मराठा समाज वांगी तसेच करमाळा येथील बांधवांनी मोठे परिश्रम घेतले


मुस्लिम समाजाचा असा एक मदतीचा हात

करमाळा वांगी मार्गावर देवळाली येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वांगी येथील सभेला जाण्यासाठी निघालेल्या सकल मराठा समाज बांधवांसाठी देवळाली येथील सकल मुस्लिम बांधवांनी मराठा समाजाच्या बांधवांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button