पालघर जिल्ह्यातील डहाणू आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन बेजबाबदार महिला डॉक्टरांवर कारवाई

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक:7030516640
डहाणू आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी एका गरोदर महिलेची प्रसूती केली होती.
यामुळे या रुग्णालयातील अनुपस्थितीत तीन बेजबाबदार महिला डॉक्टरांवर पालघर जिल्हा परिषदे कडून कारवाई करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन महिला डॉक्टर पूर्ण वेळ कार्यरत असताना देखील 16 नोव्हेंबर रोजी एक ही डॉक्टर आपल्या कर्तव्यावर हजर नसल्यामुळे या रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची प्रसुती या रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी केली होती.
यामुळे या बेजबाबदार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रूपाली मालवणकर आणि डॉक्टर कृतिका जनाठे यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.तर नियमित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षितिजा पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी बजावले आहेत.



