माळीनगर ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलचा झेंडा… सरपंच पदाचे उमेदवार अनुपमा अनिल एकतपुरे बहुमताने विजयी

माळीनगर परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांची अभिनंदन करताना जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
माळशिरस तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या माळीनगर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ६ नोव्हेंबर २०२३ रोजी घोषित करण्यात आला.ही पंचवार्षिक निवडणूक पंचायत समितीचे माजी उपसभापती माळीनगर परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख सुभाषदादा निंबाळकर, समिरदादा पांढरे, कांतीलाल एकतपुरे, माऊली थोरात, हेमंत रासकर, कल्पेश पांढरे, अनिल लोंढे,यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती
माळीनगर ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षापासून माळीनगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या नेतृत्वाखाली माळीनगर विकास आघाडी पॅनलची सत्ता होती परंतु या निवडणुकीमध्ये मतदारांनी सत्ता परिवर्तन करत माळीनगर परिवर्तन पॅनलला दणदणीत विजय मिळवून दिला
या निवडणुकीमध्ये माळीनगर परिवर्तन पॅनलच्या महिला उमेदवार अनुपमा अनिल एकतपुरे बहुमताने विजयी झाल्या. त्यांच्या सोबत माळीनगर परिवर्तन पॅनलचे १२ सदस्य निवडणूक लढवून विजयी झाले एकूण १७ जागे पैकी १२ जागेवर परिवर्तन पॅनलने झेंडा फडकवला आहे.
वार्ड क्र १ मधून विशाखा विराज निंबाळकर, अभिजीत सुखदेव वजाळे, रूपाली भारत शिंदे, वार्ड क्र ४ मधून प्रदीपकुमार सुभाषराव निंबाळकर, आसमा रियाज मुलाणी, चांदणी विशाल वजाळे, वार्ड क ५ मधून अतुल नवनाथ कांबळे, जयश्री किसन जाधव, रूपाली सतिश तूपसौंदर्य, वार्ड क्रमांक ६ मधून विराज प्रकाशराव निंबाळकर, सोनाली आदेश लोंढे, अमोल विजय साठे, हे विजयी झाले आहेत.



