शहर

आगरी सेनेच्या रणरागिणींचे आमरण उपोषण अखेर.. खासदार गावित यांच्या मध्यस्थीनंतर यशस्वी..सुर्या धरणाचे पाणी त्वरीत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.

पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहरातील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आगरी सेनेच्या महिला कार्यकर्त्या रुपाली पवार, त्रिवेणी माने व अश्विनी खेवरा यांनी मागील पाच दिवसांपासून विरार शहरात आमरण उपोषण सुरू केले होते.

शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजे उपोषणाच्या पाचव्या दिवशी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी या उपोषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूर्या नदीचे पाणी वसई विरार शहरातील नागरिकांसाठी त्वरित सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी उपोषणकर्त्या आगरी सेनेच्या महिलांना देऊन खासदार राजेंद्र गावित यांनी आगरी सेनेच्या महिला कार्यकर्त्यांना हे उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केल्यावर शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी खासदार राजेंद्र गावित यांच्या मध्यस्थी मुले हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

याप्रसंगी आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील, महाराष्ट्र काँग्रेस सचिव विजय पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेचे शहर अभियंता राजेंद्र लाड, प्रदीप पाचंगे, महसूल विभागाचे अधिकारी व विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button