महाराष्ट्र

मानवहित लोकशाही पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी अभिमान नाईकनवरे यांची निवड !

संपादक नौशाद मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज :- मानवहित लोकशाही पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी अभिमान चांगदेव नाईक नवरे यांची निवड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सज्जन भाऊ लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आली.

मानवहित लोकशाही पक्ष हा साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या वारसदाराच्या संकल्पनेतून लहुजी,शाहू,फुले,आंबेडकर या थोर महापुरुषांच्या विचारावर आधारित असून महाराष्ट्रातील समाज बांधवांचा उद्धार करण्यासाठी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाची चळवळ गतिमान व्हावी व देशपिता लहुजी वस्ताद साळवे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यघटनेची अंमलबजावणी व समाजावर होणाऱ्या अन्यायाचा प्रखर विरोध करत मानवाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारा पक्ष म्हणून या पक्षाची ओळख आहे. बहुजन समाजातील मागासलेपणा दूर करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी सतत कार्यरत असणारा पक्ष मानवहित लोकशाही पक्ष यालाच अनुसरून अभिमान नाईकनवरे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान, गुणवत्ता व कार्यक्षमता त्यांची सोलापूर जिल्ह्यात असणारे अनेक हितसंबंध अनेकांशी अगदी मनमोकळ्यापणाचे बोलणे त्यांच्याशी असणारे अनेकांची जवळीक व त्यांचा जनसंपर्क पाहता याचा भविष्यात मानवीत लोकशाही पक्षाला होणारा फायदा याच उद्देशाने मानवीत लोकशाही पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सज्जन भाऊ लोखंडे यांनी अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वानुमते माळशिरस तालुका अध्यक्षपदी अभिमान चांगदेव नाईक नवरे यांची निवड केली व त्यांना पक्षाचे काम सर्व जाती-धर्माच्या समाजातील लोकांपर्यंत प्रसार व प्रचार करून पोहोचवावे व पक्ष संघटन करावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी क्रांतिकारी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ भोसले, राजाभाऊ गायकवाड, महादेव कोळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लावंड साहेब,साठे साहेब,प्रदीप नाईकनवरे, दादा नाईकनवरे, दत्ता भाऊ नाईकनवरे, यांच्यासह आदी पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button