महाराष्ट्र

तांदुळवाडी येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने नंदकिशोर निळकंठ यांचा सत्कार संपन्न

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007932121

सांगली : तांदुळवाडी (ता वाळवा) शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर निळकंठ, तांदूळवाडी यांची गौण खनिज / खणी कर्म शासकीय कमिटीवर निवड झाल्याबद्दल जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. डॉ. संजय थोरात म्हणाले, या ग्रुपने भविष्यात सकारात्मक व नियोजनबद्ध वाटचाल करावी. व समाजाभिमुख काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा.कारण या ग्रुपमध्ये अनेक सदस्य हे आप आपल्या विभागात अत्यंत चांगले काम करत आहेत.जात,धर्म,पद याच्या पलीकडे जावून दरवर्षी काही विधायक उपक्रम ही या ग्रुपने राबविले आहेत.

यावेळी विलासराव कोळेकर म्हणाले,
या ग्रुपने पुढील कालावधीत धोरणात्मक काम करण्यासाठी एका विशेष सभेचे आयोजन करावे असे सुचवले.तसेच नंदकिशोर निळकंठ यांचा सामाजिक व राजकीय प्रवास हा कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील म्हणाले सर्वांनी एकत्रित येऊन संस्थात्मक बांधणीचे काम करावे आम्ही लागेल ते सहकार्य करू शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडे, जगन्नाथ माळी ,जयसिंग उथळे, धनपाल माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

सत्कारास उत्तर देताना श्री. नंदकिशोर निळकंठ म्हणाले, या पदाचा मी योग्य वापर करुन अत्यंत प्रभावीपणे काम करणार आहे. जिवलगांनी केलेल्या सत्कार हा सर्वोच्च सन्मान आहे. शासनाने आणि जिवलगांनी दाखवलेला विश्वास सार्थ केल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही.
तांदूळवाडी येथील सत्कार समारंभास गव्हर्मेंट कॉन्ट्रँक्टर प्रशांत पाटील, जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री. जगन्नाथराव माळी, दिपकराव आडसुळ, वृध्द कलाकार मानधन योजना सांगली जिल्हा सदस्य श्री. सागर मलगुंडे, शिवाजीराव शेलार, उद्योजक जयसिंगराव उथळे, दीनदयाळचे संचालक डॉ. शिवाजीराव जाधव, राजेंद्र लोंढे, कोल्हापूर चे शशिकांत माने, अदित्य यादव, उद्योजक दिपकराव निळकंठ, माजी सरपंच संजयराव कदम, मनिष जाधव, बाळासाहेब सावंत, सुर्यकांत देसाई, दिलीपराव सांडगे, शेतकरी नेते धनपाल माळी, जिवन जाधव, शिवाजीराव पाटील, प्रशांत जाधव, बारामती चे सचिन राऊत, जगदीश कुशिरे, दत्ताभाऊ पाटील, सिध्दार्थ कांबळे, विनोद मोहिते, शिवप्रतिष्ठानचे पांडूरंग वाघमोडे, सुभाष पाटील, विजय कवठेकर, कृष्णात खोत, व्यावसायीक हामजेखान पट्टेकरी, दिपक पडळकर, विजय पाटील, संजय कुशिरे, सतिष पाटील, संतोष माने, अभिजित नांगरे, चंद्रकांत शिंदे, लालासो साळूंखे, प्रदिप पाटील, रणजित शेटे, वैभव जाधव, राजकुमार गोसावी आदी जिवलग मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शानदार कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रुप अँडमिन श्री. बजरंग कदम (आण्णा) यांनी केले.आभार मनिष जाधव, दिपक निळकंठ यांनी मानले. व्यापक मेळाव्यानंतर सर्व मित्रपरिवार यांनी एकत्रितपणे स्नेहभोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button