तहसिल कार्यालय शहराबाहेर हलविण्याच्या प्रक्रियेला वंचित बहुजन आघाडी चा विरोध

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख
आज करमाळा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व ग्रामीण भागाच्या वतीने तहसील कार्यालय शहराबाहेर हलविण्याच्या प्रक्रियेला विरोध म्हणून मौलाली माळ याठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले जर प्रशासकीय कार्यालये शहराबाहेर गेले तर ते सर्व सामान्य नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागणार आहे

आजची परिस्थिती पाहिली तर ब्रिटिश कालीन तहसील कार्यालय सुस्थितीत आहे तरीही नवीन तहसील कार्यालय शहराबाहेर हलविण्याचा घाट घातला आहे म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हळ तालुका उपाध्यक्ष अजय पवळ शहराध्यक्ष विशाल लोंढे शहर उपाध्यक्ष यशवंत कांबळे उपाध्यक्ष जितेश रणबागुल ता संघटक विनोद धेंडे युवा तालुका युवा जिल्हा उपाध्यक्ष आनंद पवळ उपाध्यक्ष संभाजी कांबळे महेंद्र जगदाळे प्रविण कांबळे शुभम देडगे संतोष पवळ शैलेश कांबळे भैय्या पवार बंटी कांबळे युवा नेते निलेश कांबळे सचिन घोडके मदारी समाजाचे अध्यक्ष उम्मर मदारी विलास ओव्हळ अशोक ओव्हळ मधुकर लावंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते



