दिवांकुर बहु.सा.सेवा.संस्था पुणे ( महाराष्ट्र राज्य) च्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
हनुमान नगर, तक्षशीला बुद्ध विहार,पौड रोड, कोथरूड छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सावा निमित्ताने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून समाजातील ज्या विद्यार्थ्यांचे पालक अपंग आहेत व ज्यांची परिस्थिती बेताची आहे, अशा गरजु निरागस इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिवांकुर सा. संस्था नेहमीच समाजहित डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे.सामाजीक बांधीलकी जपत असे अनेक छोटे -छोटे उपक्रम राबवित आहे.छ.शिवाजी महाराजांनी जनतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन केले.त्यांचे कार्य , पराक्रम , विचार आजही प्रेरणादायी आहेत.महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून, स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथांच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या,तर डाॅ.बाबा साहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले अशा त्रिरत्न महापुरुषांची जयंती उत्सावा निमित्ताने निरागस,गरजु, मुलांना इ.तिसरी ते दहावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य(वही,पेन,रायटींग पॅड)वाटप करण्यात आले.
मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले,डाॅक्टर, इंजीनियर, अधिकारी होण्याची इच्छा या मुलांनी व्यक्त केले.प्रसिध्द निवेदक दीपकराज म्हस्के, कानडे काका, रक्तदान क्षेत्रात विशेष कार्य असलेले सुरेश सपकाळ,माजी सैनिक सहदेव इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व संस्थेच्या कामाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले संस्थेच्या अध्यक्षा अर्चना म्हस्के यांनी संस्थेच्या माध्यमातून यापुढेही असे अनेक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असेल, जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने नियमित पुस्तक वाचन करण्याची सवय मुलांनी जोपासावी असे मत व्यक्त केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मीना ठुले, वैद्यकीय पर्यवेक्षक संध्या म्हस्के, सामाजिक कार्यकर्त्या विद्या पासोटे,सिमा गुंड,सविता वर्वे,वैशाली नलावडे, संभाजी सातपुते,भरत ठुले,सिमा हिरवे,श्रीकांत हीरवे,दिलीप म्हस्के, सुरेंद्र शिंदे, उद्योजक शरद शेंडकर, तृप्ती म्हस्के,साहील तावरे, चैतन्य बांगर, कृष्णा खंकाळ, दैनिक लोकमत चे पत्रकार विशाल सातपुते, आनंदीबाई सोनवने, प्रियंका थोरात,तक्षशीला बुद्ध विहार सदस्य व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक -लक्ष्मण म्हस्के यांनी केले, मुलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मुलांच्या अंगी शिकण्याची जिद्द असेल तर संस्था अशा विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न नक्की करेल.दिवांकुर संस्था व सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला त्यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले.



