श्री लक्ष्मी नृसिंहाचा नृसिंह नवरात्र महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, 8378076123
येथील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी – नृसिंह मंदिरामध्ये श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सव बुधवार (दि. २६ एप्रिल) ते शनिवार (दि. ६ मे) होणार आहे. उत्सवा निमित्ताने ११ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिली आहे.

श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सवा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बुधवारी (दि. २६) भरतनाट्यम- सुदेष्णा दाणी, प्रवचन- प्रा. बाळासाहेब देहूकर, सुगम संगीत- सचिन इंगळे, जितेंद्र अभ्यंकर, कीर्तन- आनंद काकडे. गुरुवारी (दि. २७) भावगीत- रसिका व सानिया कुलकर्णी, प्रवचन- पद्मनाभ व्यास, कीर्तन- संध्या पाठक, शुक्रवारी (दि. २८)- बासरी वादन- नंदकुमार डिंगरे, प्रवचन सुरेश सूळ, भरतनाट्यम- स्वाती दैठणकर, कीर्तन- स्वरदा पटवर्धन यांचे होणार आहे.

तसेच शनिवारी (दि. २९) भक्तिगीत- तुषार केळकर, प्रवचन- देविदास जोशी, कीर्तन- वासुदेवबुवा बुरसे. रविवारी (दि. ३०) सुगम भक्तिसंगीत- गिरीश कुलकर्णी, प्रवचन- लता देशपांडे, भक्ती सुधा- पंडित अतुल व आशिष केसकर परिवार, वसंत पूजा समस्त ब्राह्मणवृंद, किर्तन- वासुदेवबुवा बुरसे. सोमवारी (दि. १ मे) अभंग यात्रा- निशिकांत खळदकर, मुक्ताई, एक अविष्कार- प्रचिती सुरू कुलकर्णी, प्रवचन- प्रशांत सुरू, विशेष कार्यक्रम – भक्ती पागे व सहकारी यांचे होणार आहे.
तर किर्तन – प्रदीपचंद पुजारी. मंगळवारी (दि. २) सुगम भक्तिसंगीत- सुकन्या व सुप्रिया दंडवते, प्रवचन- डॉ. लक्ष्मण आसबे, कीर्तन- राघवेंद्र देशपांडे. बुधवारी (दि. ३)- भक्तिसंगीत- सारंग संगीत विद्यालय अकलूज, सुगम भक्तिसंगीत- प्रफुल्ल अरगडे, शुभांगी अरगडे, पं. रमेश रावेतकर, भक्तिसंगीत- मंजिरी कर्वे आलेगावकर, कीर्तन- भालचंद्र देव. गुरुवारी (दि. ४)- भक्तिसंगीत- अजित गोसावी, सुगम भक्तिसंगीत- संगीता चाटी, प्रवचन- मोहनबुवा रामदासी यांचे होणार आहे. हार्मोनियम साथ गंगाधर देव ( पिरंगुट), तबला साथ दिनकर गोसावी ( इंदापूर ) यांची लाभणार आहे.

श्री नृसिंह जन्मकाळ कीर्तन- ह.भ.प. विलास महाराज गरवारे यांचे होणार आहे. शुक्रवारी (दि. ५)- रात्री छबिना, श्रींची पालखी मिरवणूक. शनिवारी (दि. ६)- काल्याचे कीर्तन- ह.भ.प. अंकुश महाराज रणखांबे यांचे होणार आहे. नृसिंह जयंती महोत्सवानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.



