क्रीडा

स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित टेनिस बाॕल स्पर्धेत पंढरपूर नगरपरिषदेने पटकाविला चषक

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अभियान अंतर्गत मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंढरपूर नगरपरिषद संघाने कुर्डवाडी नगरपरिषद संघाचा तब्बल 105 धावांनी पराभव करत वसुंधरा चषक पटकाविला.त्यांना रोख रक्कम 21 हजार व चषक शंकरनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, पंढरपूरचे आरोग्य अधिकारी राजू तोडकर यांच्यासह विविध नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम रुपये 15 हजार व चषक कुर्डुवाडी नगरपरिषद संघास तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 11 हजार व चषक बार्शी संघाने मिळवले त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

याशिवाय उत्कृष्ट गोलंदाज कुर्डूवाडी नगर परिषदेचे विनोद यांना, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बार्शी नगरपरिषदेचे भैय्या शिंदे यांना, तर उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द मॅच, मालिकावीर चे पारितोषिक पंढरपूर नगरपरिषदेचे नितीन मेहडा यांना मिळाले. या बरोबरच शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक कुर्डुवाडी संघाने पटकाविले.सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अकलूज नगरपरिषदेने नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत माळशिरस, कुर्डूवाडी, नातेपुते, वैराग, श्रीपुर-महाळुंग, पंढरपूर, बार्शी, मोहोळ, माढा, कुर्डवाडी, सांगोला, अकलूज या 12 नगरपरिषद व नगरपंचायतीच्या संघाने सहभाग नोंदवला होता.

अंतिम सामन्यात पंढरपूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 07 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात 149 धावांचा डोंगर उभा केला यामध्ये नितीन मेहडा यांच्या एकट्याच्या 108 धावांचा समावेश होता 149 धावांचा पाठलाग करताना कुर्डूवाडी संघाला 06 बाद 44 धावापर्यंतच मजल मारता आली.दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी किशोरसिंह माने पाटील, ऍड. नितीनराव खराडे, अनिल जाधव सर उपस्थित होते. तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ज्वाईंट सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांनी स्पर्धेला भेट दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button