महाराष्ट्र

जेऊरकराच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,सरपंच पदाचे उमेदवार पैलवान पृथ्वीराज भैया पाटील

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

जेऊरकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे ठाम प्रतिपादन सरपंच पदासाठी उभे असलेले पृथ्वीराज पाटील यांनी केले. प्रभाग क्रमांक चार मधील प्रचार सभेत ते बोलत होते. माजी आमदार नारायण (आबा) पाटील प्रणित श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रभाग चार व तीन मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी गावडे गुरुजी.हे होते.तर यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नारायण आबा पाटील, सभापती अतुलभाऊ पाटील, माजी सरपंच भास्कर (भाऊ) कांडेकर,राजूशेठ गदिया,माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सेवानिवृत्त सोसायटी सचिव हंबीराव चव्हाण,सोसायटी चेअरमन राजाभाऊ जगताप, व्हॉईस चेअरमन महेश बाबूराव कांडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मुबारक शेख, पैलवान हनुमंत कांडेकर, शिवाजी कांडेकर, घाडगे गुरुजी, गैबु मुल्ला,जालिंदर कांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की जेऊर शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द असून या निवडणुकीत आगामी पाच वर्षात कोणती विकासकामे करायची आणि मागील तीस वर्षात आमच्या गटाने कोणती विकासकामे करून दाखवली याचा लेखाजोखा असलेला जाहीरनामा घेऊन उतरलो आहोत. यात सर्व भागातील वीज, पाणी, रस्ते, गटारी ह्या मूलभूत प्रश्ना शिवाय आणखी खूप चांगले संकल्प आम्ही या शहराच्या विकासासाठी हाती घेतले आहेत.

मतदारांचा आशीर्वाद हा कायमच माजी आमदार नारायण (आबा) पाटील प्रणित श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलला राहिला आहे. आजवरच्या आमच्या सर्व सरपंचांच्या कालावधीत अनेक चांगली विकासकामे झाली आहेत. हा विकासाचा रथ असाच पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी मतदारांनी आमच्यावर टाकावी आम्ही आपण दिलेल्या या संधीचे सोने करून दाखवू अशी हमी यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी आपण या पॅनलच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असून जेऊर शहराच्या विकासकामांना वरिष्ठ पातळीवरून निधी मिळवून देण्यासाठी कटिबध्द असणार आहोत.

या नवीन ग्रामपंचायत बॉडी वर आपला कायमच अंकुश राहणार असून यांच्या हातून पारदर्शक व लोकहिताची विकासकामे करवून घेण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी अतूल भाउ पाटील, राजाभाऊ जगताप,घाडगे गुरुजी यांनी विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांनी केले तर आभार माधव कांडेकर यांनी मानले.प्रभाग ४ व ३ यासाठी या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले. प्रभाग ३ मधून मालन निमगिरे, उमेश मोहिते, शबाना पठाण तर प्रभाग ४ मधून ओंकार कांडेकर, प्रियांका निर्मळ आणि अलका किरवे हे उमेदवार निवडणुक रिंगणात उभे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button