पुढाऱ्यांना गाव बंदी असताना भैरवनाथ शुगर युनिट 4 आलेगाव बुद्रुक चे मोळी पूजन कसे?

नानासाहेब चंदनकर टेंभुर्णी प्रतिनिधी 8208530338
मौजे आलेगाव बुद्रुक तालुका माढा येथील ग्रामपंचायत ने पुढाऱ्यांना मराठा आरक्षणा निमित्त गावबंदी केली असताना भैरवनाथ शुगर युनिट चार आलेगाव बुद्रुक येथे सोलापूर जिल्हा, शिंदे गटाचे संपर्कप्रमुख श्री शिवाजी सावंत यांनी कारखान्यावर येऊन मोठ्या दिमाकात मोळीपूजन व बॉयलर पूजन संपन्न केले.

या गोष्टीला स्थानिक ग्रामपंचायतीने त्यांना गाव बंदी असताना कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. सावंत बंधूनी मराठा आरक्षणाबाबत आपली कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. उलट आलेगाव बुद्रुक मधील ग्रामपंचायतीने पुढाऱ्यांना गावबंदी केली असताना सावंतने कोणाला विचारून हा सोहळा पार पडला याचे उत्तर आलेगाव बुद्रुक ग्रामस्थांना मिळेल काय?

महाराष्ट्रात सर्वत्र पुढाऱ्यांना गाव बंदी असताना शिवाजी सावंत यांनी बॉयलरची पूजन करून मराठा समाजाचा अपमान केला आहे.



