महाराष्ट्र

आलेगाव बु येथील भैरवनाथ। विद्यालयाची दुरावस्था

टेंभुर्णी प्रतिनिधी -नानासाहेब चंदनकर मो-8208530338

मौजे आलेगांव (बु) ता.माढा जि सोलापूर येथील महात्मा फुले शिक्षण व समाज विकास मंडळ केम संचलित भैरवनाथ विद्यालय आलेगाव (बु) विद्यालयाची अवस्था अतिशय दैनिय अशी झाली आहे. कारण ३५०/४०० पट असताना निकालाची परंपरा १००/असताना शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यालया चा एकदम १२० पट वरती आलेला आहे या मध्ये संस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांच्या बदल्या, विद्यालयाकडे लक्ष न देणे, काही नवीन शिक्षक भरलेले असताना त्यांना एक रूपयाची ही मदत न करणे असा या संस्थेचा कारभार चालू आहे.

त्याचप्रमाणे गावातील काही स्थानिकांनी लक्ष न दिल्यामुळे मुलांची संख्या कमी झाली आहे अशा या सर्वांच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यालयाचे मात्र खुप मोठे नुकसान झाले आहे.

मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी आपापली मुले त्यांच्या सोयीनुसार बाहेर गावी शिकण्यास पाठवले. त्यामुळे गोरगरीब मुलांच्या शिक्षणावर खुप मोठा परिणाम झालेला आहे. यासाठी स्थानिक प्रशासन, शासन संस्था काय प्रयत्न करतील असा प्रश्न गोरगरीब जनतेला पडलेला आहे.

याच्या अगोदर विद्यालयांमध्ये १००-१००गणवेश व १०००-१५००वह्या वाटप होत होते परंतु संस्थेची निष्क्रिय आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे विद्यालयाचे त्याच बरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांचे अतोनाथ नुकसान घेणार आहे याला जबाबदार कोन ? असा प्रश्न आलेगाव (बी) मधील गोरगरीब जनतेला पडलेला आहे तरी याबाबतीत संस्थेने योग्य विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा विद्यालय बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button