महाराष्ट्र

किती सांगु मी सांगु कुणा कुणाला…आमचं ठरलंय आणि खरंच ठरलंय…!

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499

इंग्लिश मध्ये एक म्हण आहे Your problem isn’t the problem,your reaction is the problem म्हणजे तुमची समस्या हि समस्या नसुन तुमची “प्रतिक्रिया” हिच समस्या आहे,अशीच काही तरी अवस्था भाजपा च्या माढा लोकसभा मतदार संघात उमेदवाराची अन् त्यांच्या कार्यकर्त्यांची झाली आहे…

तर एकंदरीत पणे जर पहायला गेलो तर आज जवळ जवळ पंधरा दिवस उलटून गेले असतील विद्यमान खासदारांची उमेदवारी जाहीर होऊन परंतु स्वतः खासदार आणि त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत की अकलूज चे मोहिते पाटील काय निर्णय घेणार…मोहिते पाटील परिवाराच्या जिवावर आपण निवडून हि आला आहात,याच मोहिते पाटलांनी आपल्या गळ्यात खासदाराची माळ गुंफलेली आहे आणि याच मोहिते पाटलांना तुम्हाला माजी खासदार करायला जरा हि वेळ लागणार नाही…

ते अजुन हि सबुरीनेच घेत आहेत तो पर्यंत तुम्ही मतदार संघातल्या सर्व आमदारांच्या बंगल्यांची प्रदक्षिणा पूर्ण करा,अजुन मोहिते पाटलांनी त्यांची भुमिका हि स्पष्ठ केली नाहीये तरी “पुष्पवृष्ठी” करून जनता स्वागत करत आहे,असे प्रेम अन् आपुलकी राजकारणात मिळवायला नशीब तर लागतेच आणि जनतेचा तेवढा विश्वास देखील…

तुम्ही कुण्या सोम्या गोम्या च्या सांगण्याने मोहिते पाटलांचा नाद तर केलाच आहे पण तो नाद शेवट पर्यंत टिकवा म्हणजे झालं…

आत्ता पर्यंत तुमच्या प्रचाराच्या तीन फेऱ्या पुर्ण होणे गरजेचे होते परंतु तुम्ही “सागर” बंगल्यावर किती फेऱ्या केल्या हे हि जनतेला एकदा सांगाच,कारण तुमच्या पक्षांचे संकट मोचक या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा अकलूज ला येतायेत,याच्या मागचे कारण काय असेल हे कुणाला सांगायची गरज नाही…

विहिरीत सरबत केलेली लोक आहेत हि एखाद्या देशा कडे सैनिकांचा फौजफाटा नसेल एवढा “निष्ठावंत” कार्यकर्त्यांचा तोफखाना आहे मोहिते पाटलांकडे हे फक्त लक्षात ठेवा…

राजकारणात तीन पिढ्यांची यशस्वी कारकीर्द असणारे मोहिते पाटील आपणांस झेपणारच नाहीत,हे त्रिवार सत्य पचवायची देखील ताकत ठेवा…

एक आपुलकीचा सल्ला…”जिंदगी तो अपने दम पे जी जाती है औरों के कंधो पे तो जनाजे उठते है…

तुम्ही हजार भविष्यवाल्या कडे जरी गेलात तरी तेथुन रिकाम्या हाताने परत तर यालच कारण आमचं ठरलंय,खरंच ठरलंय राव… तुम्हाला सांगून काय फायदा…?
बाकी आपली मर्जी…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button