महाराष्ट्र

बाल रुग्णांना संजीवनी स्पर्श देणारा सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील “अवलिया” म्हणजे पंढरपूर चे डॉ शितल शहा…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499

वैद्यकीय क्षेत्रातील “अवलिया” म्हणुन प्रसिद्ध असलेले डॉ शितल शहा यांचा जन्म बारामती तालुक्यातील निरा या गावी 30 मार्च 1953 साली झाला,घरची परिस्थीती बऱ्या पैकी,लहान पणापासून एखादे ध्येय निश्चित करून ते ध्येय यशस्वी पणे पार करण्यासाठी धडपड करणारे डॉ शितल शहा हे 1980 च्या सुरुवातीला आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन पंढरपूर येथील आसपास च्या खेड्यात आपली सेवा बजावण्यासाठी आले अन् कायमचेच पंढरपूर वासी झाले…

वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना डॉ शितल शहा यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक समाजातील गरीब बाल रुग्णासाठी “महात्मा फुले जन आरोग्य” हि योजना चालु करून अनेक गोरगरीब लोकांचे आशिर्वाद तर मिळविले आणि त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील याच सेवे मुळे सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या वतीने त्यांचा विशेष गौरव हि करण्यात आला…

डॉ शितल शहा हे अनेक सामाजिक संस्थेशी ऋणानुबंध ठेवत समाज सेवेचे कार्य आणखी नेटाने पुढे नेत आहेत…

समाज सेवेचे अविरत काम करणाऱ्या डॉ शितल शहा यांनी पंढरपूर येथे बाल रुग्णांसाठी एक अद्यावत अशा हॉस्पिटल ची उभारणी केली असुन अनेक पुरस्कारांनी हि त्यांना सन्मानित करण्यात आले आहे…

डॉ शितल शहा यांना 2002 साली दिल्ली सरकारने राष्ट्रीय गौरव पुरस्कार हि दिला असुन आपल्या सरळ भाषेत सांगायचे झाल्यास अनेक गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वी करून त्यांनी या क्षेत्रांमध्ये विक्रम प्रस्थापित केलेले आहेत…

सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली दैवी देणगी म्हणजे डॉ शितल शहा…

त्यांना वाढदिवसानिमित्त टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क, समुह अकलूज आणि आमीर मोहोळकर परिवाराच्या वतीने खुप खुप शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button