महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा करमाळा शहर उपाध्यक्षपदी फैजान शेख यांची निवड

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

भारतीय जनता पार्टी करमाळा युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी फैजान शेख यांची निवड करण्यात आली आहे सदरची निवड करमाळा शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे

जगताप गटाचे युवा नेते तसेच भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष माननीय शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सदरची निवड करण्यात आली

फैजान शेख हे करमाळा शहरातील प्रसिद्ध असे इलेक्ट्रिक व्यवसायातील युवा उद्योजक अल्लाउद्दीन शेख यांचे चिरंजीव आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व सरातून विशेष अभिनंदन होत आहे

भारतीय जनता पार्टीचे आचार विचार तसेच पक्ष वाढीसाठी मी आमचे मार्गदर्शक युवा नेते माननीय शंभूराजे जगताप यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सर्व करमाळा शहरात पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची माहिती फैजान शेख यांनी पत्रकारांना बोलताना दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button