बिबट्याची दर्शन आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

“~टाइम्स 9 मराठी न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121~“`
सांगली: वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत आहे. दररोज बिबटे नागरिकांच्या निदर्शनास पडत आहेत. काळमवाडी येथे कोळकमळा या ठिकाणी भोजिराया टेकडी जवळ मुले सायंकाळी गेली असता त्यांना एक मादी आणि दोन पिले दिसली, त्यानंतर देसाई मला, विशेष म्हणजे याच भागात वारंवार शेतकऱ्यांना नजरेत येत आहे,ही टेकडी मानवी वस्ती पासून जवळच आहे.
बिबट्याचे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य वाढू लागले आहे. त्यामुळे दिवसा शेतामध्ये जाणे अवघड झाले आहे. या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, पाऊस कमी झाल्या मुले आणि शेतातील वीज वेळ रात्रीची असल्यामुळे शेताला पाणी देण्यासाठी जाणे कठीण झाले आहे, ग्रामस्थांची प्रशासनाला व वीज महामंडळाला एक विनती आहे 3 दिवस दिवस आणि 3 दिवस रात्रीची वीज असते 3 दिवस रात्रीची 8 तास वीज देण्या ऐवजी 3 दिवस 6 तास दिवसा वीज द्यावी कारण वीज रात्रीच्या 1 वाजता जर येत असेल तर शेतात जाणारे कसे जावू शकतील,
शेतकरी राजा आहे त्याने पिकविल्यामुळेच आपण सर्व जण सुखी आहोत म्हणून त्याच्या विंतीचा विचार व्हावा आणि वनविभागाने योग्य ती पाऊले उचलावीत



