महाराष्ट्र

लाईट बिल आता यापुढे बंद,महावितरण देणार प्रीपेड मीटर केंद्र सरकारकडून मिळणार मोफत मीटर

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख

थकित वीज बिलाचे वाढते प्रमाण विज बिल जादा आल्याच्या तक्रारी विजेची चोरी या सर्व पार्श्वभूमीवर महावितरण ने आता प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठीची तयारी महावितरणने सुरू केली आहे येथे काही महिन्यात हे मीटर टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत त्यामुळे विज बिल बंद होणार असून ग्राहकांना आता आधीच मीटर रिचार्ज करावे लागणार आहे राज्यातील महावितरणच्या दोन कोटी एकेचाळीस लाख ग्राहकाचे सध्याचे पारंपारिक मीटर बदलण्यात येणार असून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील स्मार्ट मीटर बसवल्यावर वीज ग्राहकांना मोबाईल फोन प्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीस वापरता येईल विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे

किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळणार आहे त्यामुळे भरलेल्या पैशांपैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना ठरवता येईल ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहे या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरण तर्फे करण्यात येणार आहे सध्याच्या पद्धतीत वीस ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिलबिल पाठवले जाते एखाद्या ग्राहकाने नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येथे व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते वीज वापरले असल्याने त्याचे बिल भरल्याशिवाय पर्याय नसतो

मग नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीस ग्राहक आधी पैसे भरूनच तेवढ्या रकमेची विज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येणार असल्याचे महावितरण म्हटले आहे प्रीपेड स्मार्ट मीटर मध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीस पुरवठा खंडित होईल पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीज वापराचे आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे ठरले आहेत हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवण्याची व्यवस्था आहे

पैसे संपले तरी वीज पुरवठा रात्री चालूच राहील

एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्येच रात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button