शहर

पालघर केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील खार्डी गावात प्रकाश घरत यांची दगडाने ठेचून हत्या

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील खार्डी गावातील एका इसमाची भर दिवसा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.ही घटना सोमवारी खार्डी गावात घडली आहे.

केळवा पोलीस ठाणे हद्दीतील खार्डी गावातील शिप कंपनी जवळ असलेल्या गुरचरण जागेत म्हशी चारण्याच्या कारणावरून प्रकाश यशवंत घरत वय वर्ष 45 राहणार खार्डी गांव व वसंत भोईर वय वर्ष 46 राहणार खार्डी गाव या दोघांमध्ये सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी वाद होऊन झालेल्या जबरी हाणामारी मध्ये वसंत भोईर यांनी प्रकाश घरत यांच्या डोक्यावर व तोंडावर दगडाने जबरी मारहाण केल्यामुळे प्रकाश घरत यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत आरोपी वसंत भोईर याला केळवा सागरी पोलिसांनी अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button