महाराष्ट्र

गुढे (ता. शिराळा) गावात अभूतपूर्व राजकीय बदल

सांगली प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121

गुढे ता.शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.त्यांचे स्वागत हातकणंगले लोकसभा मतदार संघ भाजपा प्रमुख, जिल्हा बँक उनसंचालक सत्यजित देशमुख,शिराळा विधानसभा मतदार संघ भाजपा प्रमुख मा. सम्राट महाडीक बाबा,भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी केले.

यावेळी सोनिया जी उद्योग समूह चे अध्यक्ष बाजीराव शेंडगे, शिराळा चे माजी नगरसेवक केदार नलवडे, गुढे माजी सरपंच सखाराम दुर्गे,गणपती पाटील,विजय कुंभवडे, सुनिल गुरव,सरगम मुल्ला प्रमुख उपस्थित होते. गुढे येथील विठ्ठल पाटील, चंद्रकांत कांबळे,माजी सरपंच विष्णू पाटील, संभाजी सनुगले, गणपती पाटील, अधिक पाटील, दगडू काटकर, वसंत पाटील, अरुण पाटील, शिवाजी संनुगले, विष्णू नाना पाटील, आप्पा पाटील, शँकर पाटील, धोंडीराम पाटील, संतोष पाटील, विठ्ठल रामचंद्र पाटील, मारुती काटकर, विष्णू लक्ष्मण पाटील, विष्णू काटकर, नामदेव पाटील, नारायण पाटील, तुकाराम पाटील, विलास काटकर, दिलीप पाटील, अविनाश कांबळे, शिवाजी आप्पा पाटील,गणेश काटकर, रमेश पाटील,नामदेव पाटील,प्रकाश पाटील,दगडू काटकर, पांडुरंग दत्तू पाटील,विठ्ठल गुरव,संतोष पाटील, उमेश कचणकर,गणेश पाटील,जगदीश पाटील,रामचंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,आजी माजी सेवा सोसायटी सदस्य, पदाधिकारी यांनी जाहीर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.त्या सर्वांचे स्वागत मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महिला माता भगिनीं, तरुण कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button