शहर

शून्यातून विश्व निर्माण करणारा सकारात्मक ऊर्जा घेउन निघालेला उमदा तरुण मित्र…

अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर

तशी त्यांची अन् माझी मैत्री जुनीच,लहान वयात असतानाच घरची जबाबदारी अंगावर पडली,संसाराचा गाडा सुरळीत पार पडावा यासाठी त्यांंनी हाताला मिळेल ते काम केलेले,चार चौघात बसण्या उठण्यामुळे सामाजिक काम करण्याची आवड निर्माण झाली,वाचनाची त्यांना प्रचंड हौस,वाचन हे त्यांचे व्यसन बनले होते,सामाजिक कार्याचा वेध घेत असताना राजकीय परिस्थिती पाहत आपण हि समाज माध्यमात काम करावे असे वाटले अन् त्यांनी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क ची स्थापना करत अल्पावधीतच संपुर्ण माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रभर आपल्या कार्याची चुणूक दाखवली,माझा मित्र नौशाद मुलाणी यास प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

टाइम्स 9 च्या स्थापने वेळ ची गोष्ठ त्यांच्यावर अनेक संकटे आली,जवळच्या काही लोकांनी दगा बाजी केली पण डगमगेल तो नौशाद कसला,आलेल्या संकटांना दोन हाथ करत मोठ्या थाटात त्यांनी करुन दाखवलेच…

होय,माझा मित्र आणि टाइम्स 9 न्यूज नेटवर्क चे सर्वेसर्वा नौशाद मुलाणी याचा काल “प्रकटदीन” आम्ही सर्व मित्रांनी साजरा केला,परिस्थिती काहीही असो हमेशा सकारात्मक ऊर्जा घेउन निघालेला हा उमदा तरुण अगदी कमी वेळेत समाज माध्यमाच्या गराड्यात आपले वलय निर्माण करू शकला याचे आम्हा सर्व मित्रांना फार अभिमान…

प्रिय मित्र नौशाद ची पत्रकारिता अशीच बहरत राहो ही शुभेच्छा देतो आणि थांबतो…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button