महाराष्ट्र

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला हजर राहण्या पलीकडे आमदार संजय शिंदे यांचे कुकडीसाठी शून्य योगदान,,पाटील गटाचा शिंदे गटावर हल्लाबोल

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला हजर राहण्यापलीकडे आमदार संजय शिंदे यांचे कुकडी साठी शून्य योगदान असल्याचा हल्ला बोल पाटील गटाकडून करण्यात आला. कुकडीच्या आवर्तना बाबत पुणे येथील सिंचन भवन येथील बैठकीस आ. संजय शिंदे यांनी हजर राहिल्यानंतर करमाळा तालुक्यातील आवर्तना बाबत प्रसिध्दी माध्यमांना माहिती दिली. यावरुन पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आमदार महोदयांना लक्ष केले याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की सन २०१४ ते २०१९  या पाच वर्षे कालावधीत तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी सतत पाठपुरावा करून एकूण सतरा आवर्तने करमाळा तालुक्यात आणली.

मांगी सह तालुक्यात टेल वर असलेल्या कुंभेज तलावात सुद्धा कूकडीचे पाणी आणून दाखवले. कूकडी प्रकल्पात करमाळा तालुक्यासाठी हक्काचे पाच टी एम सी पाणी राखून ठेवले असून पाणी गळती मुळे अगदी पाचशे एम सी एफ टी पाणी म्हणजेच अर्धा टी एम सी पाणी सुद्धा मिळत नाही ही बाब अधिवेशन काळात सभागृहात मांडली.यातूनच मग कुकडी चारी अस्तरीकरण, अनेक दशके शेतकऱ्यांना न दिलेले थकीत भू भाडे, पोंधवडी चारीचे काम, कुकडी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलावांचे मजबुतीकरणं आदी कामासाठी निधीची मागणी केली.

या अगोदरची या प्रकल्पाचा सूप्रमा मधील आर्थिक उद्दीष्ट पूर्ण झाल्याने निधी मिळू शकत नव्हता. यामुळे तत्कालीन मंत्री प्रा राम शिंदे यांच्या समवेत राहून संपूर्ण कुकडी प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची सुप्रमा मंजुर करून घेतली. यातूनच आज पोंधवडी चारीचे काम चालू आहे. विद्यमान आमदार महोदयांनी या चार वर्षे कालावधीत कुकडी बाबत कोणते ठोस काम केले ते दाखवावे ? दहिगाव उपसा सिंचन योजना व कुकडी याबाबत आयत्या पिठावर रेघट्या मारण्याचे काम आ. शिंदे करत असून आता काही महिन्याचा कालावधी उरला असल्याने येत्या काळात काही दिव्य घडेल असे वाटत नाही.

जनता माजी आमदार नारायण पाटील व विद्यमान आमदार संजय शिंदे यांच्या कार्यपद्धती बाबत गाव पारावर, बांधावर चर्चा करत असून ऐन दिवाळीत कुकडीचे पाणी आणण्यासाठी कॅनॉल परिसरात रात्रभर जागून कार्यतत्पर असणारे नारायण (आबा) पाटील हेच जनतेला जवळचे वाटत असल्याचा विश्वास तळेकर यांनी बोलून दाखवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button