जेऊर ग्रामपंचायत निवडणुक ही तालुक्याच्या भविष्यातील नेतृत्ववास जन्म देणारी ठरणार – पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर ९८५०६८६३६०
जेऊर ग्रामपंचायत निवडणूक ही तालुक्यांच्या भविष्यातील नेतृत्वास जन्म देणारी ठरणार असल्याचे सूचक वक्तव्य पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले.
जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांना सरपंच पदासाठी उतरवले असून तालुक्यात या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की वास्तविक पाहता माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाऊल वाटेवरून पृथ्वीराज पाटील यांचाही राजकिय प्रवास सुरू होतो आहे. हा एक योगायोग असून पाटील गटाचे भविष्यातील नेतृत्व हे प्रत्येक पायरीवर अनुभव घेऊन तयार होणार असल्याचे दिसून येत आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांनी जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा त्यावेळी जेऊर ग्रामस्थांची होती. आज डॉक्टर सुभाष सुराणा यांनी पृथ्वीराज पाटील यांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठेवला व समस्त गावकऱ्यांनी यास पाठिंबा दिला आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीचा चांगला परिणाम केवळ जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणूकी पुरताच मर्यादीत नसून संपूर्ण तालुक्यात याचे पडसाद उमटले आहे. करमाळा तालुक्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

पृथ्वीराज पाटील यांच्या कडे संयम, जिद्द व चिकाटी हे गुण असून कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या निरपेक्ष समाजसेवा व योग्य न्याय या विचारांचा वारसा पुढे चाविण्याची जबाबदारी इथून पुढे कायम असणार आहे. पाटील गटाची पायाभरणी ही लोकनेते नारायण (आवा) पाटील मित्रमंडळ या माध्यमातून झाली हे जरी खरे असले तरी यास तीस वर्ष उलटून गेल्यामुळे पाटील गटाकडे युवकांना खेचून घेण्यासाठी नवा पर्यायी मार्ग नव्हता. पृथ्वीराज पाटील यांच्या राजकीय शुभारंभामुळे आता याचा थेट फायदा पाटील गटाचा जनाधार वाढवण्यास होणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले. पाटील गटाने ही निवडणुक गांभीर्याने घेतली असून पृथ्वीराज पाटील हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास तळेकर यांनी बोलून दाखवला.



