माळशिरस पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार

माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते मोबाईल नंबर 83 80 84 86 73
माळशिरस तालुक्यातील माळखांबी येथील शेतकरी शहाजी संभाजी माने देशमुख यांचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर पोलिसांनी शोधला या चोरी प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले हा ट्रॅक्टर दिनांक 24 2 2024 रोजी रात्री दहा वाजता जैनवाडी येथून ऊस भरून सदाशिवनगर येथील कारखान्याकडे निघाला होता व 25 2 2024 रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास 60 फाटा माळशिरस येथे आले असता ते ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला लावून ड्रायव्हर शौचास गेले व परत आले असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पिन काढून ट्रॉली त्या ठिकाणी सोडुन ट्रॅक्टरचा हेड व मोबाईल पाकीट नेले होते ट्रॅक्टर ड्रायव्हर यांनी माळशिरस पोलिसात तक्रार दाखल करून पोलिसांच्या पुढे ट्रॅक्टरचा शोध घेणे म्हणजे मोठे आव्हान होते .

तरी या चोरीचा लवकरात लवकर माळशिरस पोलीस स्टेशनने तपास लावून आरोपी व मुद्देमाल जप्त केला आहे. तरी ट्रॅक्टर मालक व ड्रायव्हर व नागरिकाकडून माळशिरस पोलीस स्टेशनचे पीआय नारायण पवार यांचे व माळशिरस पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल हेडकॉन्स्टेबल यांचा सत्कार करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते पोलीस हेड कॉन्स्टेबल घोगरे पोलीस नाईक खरात पोलीस कॉन्स्टेबल अजित कडाळे पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनटक्के यांचा सत्कार श्रीफळ व फेटा बांधून करण्यात आला व पोलीस स्टेशन कडून मुद्देमाल व ट्रॅक्टर ट्रॅक्टर मालकाच्या स्वाधीन करण्यात आला तरी माळशिरस पोलीस स्टेशनचे सर्व नागरिकाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत



