अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र “प्रसिद्धी प्रमुख” पदी आमीर मोहोळकर यांची निवड…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आणि अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून सबंध महाराष्ट्रात ओळख…
सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आमीर युसुफ बागवान (मोहोळकर) यांची महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे संघटन असलेले “अल्पसंख्याक विकास मंडळ” च्या पश्चिम महाराष्ट्र “प्रसिद्धी प्रमुख” पदी निवड झाल्याचे पत्र अल्पसंख्यांक विकास मंडळाचे प्रदेश अध्यक्ष शोएब भाई खाटीक यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डल द्वारे पब्लिश केले…
आमीर मोहोळकर यांचा सामाजिक जीवनाचा प्रवास “साप्ताहिक आधारस्तंभ” पासून सुरु होऊन आपल्या “टाइम्स 9” च्या माध्यमातून व्हाया “बागवान न्युज” मार्गे अल्पसंख्यांक विकास मंडळ च्या पश्चिम महाराष्ट्र “प्रसिद्धी प्रमुख” पदा पर्यंत पोहचला…
टाइम्स 9 चे संपादक नौशाद मुलाणी यांनी आमीर मोहोळकर यांना वाढदिवसाच्या हि शुभेच्छा देत बोलते केले असता ते म्हणाले की,”लोकनेते” स्व प्रतापसिंह मोहिते पाटील यांना आदर्श मानून सामाजिक जीवनाची सुरुवात केली ती आत्ता राजकारणातील युवा नेतृत्व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने इथ पर्यंत येऊन पोहचली असुन मोहिते पाटील घराण्याने नेहमीच मोलाची मदत आणि सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले…
पुढे बोलताना ते असे म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एखादे पद असेल तरच काम करता येतं असं नाही तर प्रत्येकाने आपण समाजाचे काही तरी देणं लागतो हि भावना मनामध्ये ठेऊन सामाजिक कार्य अविरतपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,सामाजिक काम करत असताना पदे येतात जातात या कडे फारसे लक्ष न देता समाज हिताचे काम केले पाहिजे कारण सामाजिक काम करणारा माणूस नेहमी लोकांच्या ध्यानात राहतो,अट फक्त इतकीच ते पद त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या डोक्यात गेलं नाही पाहिजे…
अल्पसंख्यांक विकास मंडळाने दाखविलेल्या विश्वासाने जबाबदारी वाढली असून सदर पदाचा कुठलाही गवगवा न करता समाजाच्या हिताचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करेन असे हि ते शेवटी म्हणाले…