शेतीसाठी पाणी नाही म्हणून स्थलांतरित झालेल्या कुटुंबासाठी मला रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करावयाची आहे.जनतेने बळ दिले तर सदरची योजना दोन वर्षात पूर्ण करू : माजी आमदार नारायण पाटील
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
शेतीसाठी पाणी नाही म्हणून स्थलांतरित झालेल्या कुटुंबासाठी मला रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करावयाची आहे ,जनतेने बळ दिले तर दोन टव वर्षात हि योजना पूर्ण करुन दाखवणार असे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी सांगितले. पिंपळवाडी येथील सभेत ते बोलत होते. गावभेट दौऱ्यानिमित्त आज पिंपळवाडी ता. करमाळा येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, उपसभापती दत्तात्रय सरडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी हनूमंत मांढरे-पाटील,संजय पाटील, दादा खोमणे, अभिजीत खोमणे, सचीन पाटील, दत्तात्रय चव्हाण, बाळासाहेब काळे, मदन पाटील, अविनाश खोमणे, नितीन काळे, नवनाथ भारती आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हा माझा संकल्प असून या माध्यमातून जवळपास ६५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा आपला मानस आहे. कर्मयोगी गोविंद बापुच्या समाजसेवेचा आणि त्यागाचा वारसा आणि वसा आमच्या रक्तात नसा नसांमध्ये भीनला आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळवून देणे हेच आमचे ध्येय असून यासाठी वाटेल तेवढ कष्ट करण्याची आणि किंमत मोजण्याची माझी तयारी आहे. यामुळे आगामी काळात रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करणारच असा पुनरुच्चार त्यांनी बोलताना केला. सकाळच्या सत्रात पिंपळवाडीसह रोशेवाडी, वंजारवाडी, कुरणवाडी आणि रावगाव येथे कॉर्नर बैठका झाल्या.