अवकाळी पाऊस व वादळ नुकसानग्रस्त केळीला नुकसान भरपाई देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
करमाळा तालुक्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे 4173 हेक्टर क्षेत्रातील केळीची नुकसान झाली असून याचे पंचनामे होऊन 13 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कृषी खात्यामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे
केळी उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत तात्काळ मिळावी आज शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर निवेदन दिले.यावेळी जिल्हाप्रमुख मनीष काळजी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले आधी पदाधिकारी उपस्थित होते
करमाळा तालुक्यातील 103 गावातील 4173 हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाची नुकसान झाली आहे.या नुकसान ग्रस्त केळीची शिवसेना संपर्क नेते संजय मशील कर यांनी पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहवाल दिला होता.यावेळी निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिले आहेत
संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी करमाळा
मे महिन्यात करमाळ्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने केळी पिकाचे 103 गावात नुकसान झाले आहे कृषी खात्याने सविस्तर पंचनामे करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे