महाराष्ट्र

मांगी तलाव परिसरातील रस्ते व विजेचे प्रश्न आपण कायमस्वरूपी सोडविणार,माजी आमदार नारायणराव पाटील यांचे वडगाव दक्षिण येथे गाव भेट दौरा दरम्यान आवाहन.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मांगी तलाव परिसरातील रस्ते व वीजेचे प्रश्न आपण कायमस्वरुपी  सोडवणार असून‌ वडगाव (दक्षिण), हिवरवाडी, भोसे आदि गावांनी सत्तांतर करण्यासाठी एकजूट दाखवावी असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. वडगाव (दक्षिण) येथील बैठकीत ते बोलत होते. जनसंवाद गावभेट दौऱ्यात आजच्या दुसऱ्या सत्रात पाटील यांनी भोसे, हिवरवाडी व वडगाव (दक्षिण) या गावांना भेटी दिल्या.

यात वडगाव दक्षिण येथील बैठकीस मकाईचे माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे, करमाळा कृषी उत्पन्न समितीचे माजी सदस्य देवानंद बागल, माजी सभापती शेखर गाडे, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, कुगावचे सरपंच सागर पोरे, वडगाव (दक्षिण) चे माजी सरपंच महादेव गायकवाड, सिध्देश्वर गायकवाड, गनी पठाण, बापू गाडेकर, अक्षय शिंदे, पैलवान संतोष गायकवाड, बापू नाळे, आनंद थोरात, अण्णा पाटील भांडवलकर, पैगंबर पठाण, गोरख शेळके, अजय अंधारे बाळू वाडेकर, , दिनेश गायकवाड, परशूराम भोसले, अंबादास थोरात, रघूनाथ मिस्त्री आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की मांगी तलावात क्षमते एवढे पाणी कायमस्वरूपी कधी आले नाही. भविष्यात तालुक्यातील मोठ्या गणल्या जाणाऱ्या या तलावात कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या पाठीशी उभे रहावे. सत्तातर करुन‌ जर मला एक संधी दिली तर या भागातील रस्ते व‌ वीजेचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आणि रावगाव गटावर आपण विकासकामात विशेष लक्ष‌ देणार असे ठाम आश्वासन माजी आमदार नारायण पाटील यांनी यावेळी बोलताना दिले. पै संतोष गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.सकाळच्या सत्रात माजी आमदार नारायण पाटील यांनी रोशेवाडी, पिंपळवाडी, वंजारवाडी, कुरणवाडी, रावगाव या गावांना भेटी दिल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button