अनुदानावर मका बियाणे उपलब्धशेतकऱ्यांनी फायदा घ्यावा तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन.जो प्रथम येईल त्याला प्राधान्य
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
केंद्र सरकारच्या योजनेनुसार जास्त उत्पन्न देणाऱ्या नवीन संशोधित मका हायटेक 5108 हे चार किलो ची बॅग महेश ऍग्रो एजन्सी येथे अनुदानावर उपलब्ध आहे तरी इच्छुक शेतकरी यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे
या मका संशोधित चार किलो बियाणे ची किंमत 1460 रुपये असून यावर प्रति बॅग चारशे रुपये अनुदान आहे शेतकऱ्याला अनुदान वजा जाता 1060 रुपयाला ही पिशवी देण्यात येत आहे शेतकऱ्यांनी येताना आधार कार्ड व सातबारा उतारा झेरॉक्स विक्रेत्याकडे जमा करून बियाणे घेऊन जावे
करमाळा तालुक्यासाठी 1000 किलो बियाणे उपलब्ध झाले असून 250 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे
नॅशनल सीड्स कार्पोरेशन दिल्ली या केंद्र शासनाच्या बियाणे कंपनीचे शेतकऱ्यांनी हे बियाणे घेऊन जावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे