पालघर औषध निरीक्षक आरती कांबळी सह एका खाजगी इसमाला 100000 रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने केले रंगेहात अटक

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
औषध व सौंदर्य प्रसाधने विक्री करण्यासाठी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंद केलेले मेडिकल स्टोर परत चालू करून देण्यासाठी मेडिकलच्या मालकाकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी व तिचा स्वीकार केल्याप्रकरणी एका खाजगी इसमासह महिला औषध निरीक्षक पालघर या दोघांना अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून या दोघांवर पालघर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हे दाखल केले आहेत.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मोरेगाव येथे असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये मेडिकलच्या मालकांनी औषध व सौंदर्य विक्री प्रसाधने यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना 14 जून 2024 रोजी सहाय्यक आयुक्त औषध मंडळाने नोटीस बजावून त्यांचे मेडिकल बंद केले होते. हे मेडिकल परत चालू करून देण्यासाठी सौ. आरती कांबळी औषध निरीक्षक पालघर यांच्या सांगण्यावरून त्यांचा खाजगी इसम कृष्णकुमार तिवारी वय वर्ष (52) यांनी मेडिकलच्या मालकाकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती.

याबाबत या मेडिकल स्टोरच्या मालकांनी या दोघांची तक्रार अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे 21 जून 2024 रोजी केली होती.
या तक्रारीची पडताळणी करून सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र व गजानन राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र तसेच महेश तरडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटीकरप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस हवालदार योगेश धरणे, पोलीस हवालदार विलीस भोये, पोलीस हवालदार दीपक सुमडा, महिला पोलीस हवालदार श्रद्धा जाधव, पोलीस शिपाई आकाश लोहरे, पोलीस चालक शिपाई जितेंद्र गवळे या पथकाने बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी दुपारी नालासोपारा येथे सापळा रचून मेडिकल स्टोरच्या मालकाकडून सौ.आरती कांबळी (औषध निरीक्षक पालघर ) यांच्यावतीने त्यांचा खाजगी इसम कृष्णकुमार तिवारी यांनी एक लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारल्या प्रकरणी त्याला रंगेहात अटक करून औषध निर्माता आरती कांबळी व त्यांचा खाजगी खाजगी तिवारी या दोघांवर बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी तुळींज नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



