अकलूज ते माळीनगर वाहतूक दोन दिवसासाठी वळवली…सराटी ते तोंडले रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात…
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील माळशिरस तालुक्यातील अकलूज माळीनगर दरम्यान अकलाई कॉर्नर येथे जंक्शन करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बाह्यवळण मार्गे वळविण्यात आली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या जाहीर पत्रका द्वारे दिली आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे (एन एच ९६५ जी) काम सध्या प्रगतीपथावर असून माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या सराटी ते तोंडले या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे याच मार्गावरील नवजीवन हॉस्पिटल,अकलाई कॉर्नर जवळ जंक्शन रोड करण्याचे काम सुरू आहे. सदरचे काम पालखी सोहळ्या पूर्वी पुर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.त्यासाठी दिनांक 25 जून रोजी सायंकाळी चार वाजलेपासून दिनांक 26 जून रोजी रात्री आठ वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे या मार्गावरील वाहतूक बाह्यवळण मार्गे वळवण्यात आली असल्याचे शिरीष सरदेशपांडे यांनी जाहीर पत्रकाद्वारे कळविले आहे.अशी माहिती टाईम्स 9 न्युज नेटवर्क ने दिली.