योद्धा प्रतिष्ठानचे ते “आंदोलन” अखेर रद्द…!
माळशिरस प्रतिनिधी महेश मोहिते
योद्धा प्रतिष्ठान च्या वतीने आज दिनांक 25/6/2024 रोजी स म शंकरराव मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती दुय्यम बाजार पेठ नातेपुते येथील कार्यालयासमोर बेमुदत “हलगीनाद” आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.
ह्या आंदोलनाचा धसका संबंधीत अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर आणि संबंधित अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत कृषी उत्पन्न बाजार समिती नातेपुते येथील आंदोलन रद्द करण्यात यावे असे पत्र आंदोलनं कर्त्यांना देण्यात आले.
संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या एका पत्राद्वारे असे सांगण्यात आले की,संत ज्ञानेश्वर महाराज पालखी निमित्त नातेपुते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजन जागेत नातेपुते येथील लोकांच्या मनोरंजनासाठी देण्यात आलेली जागा ही रद्द करण्यात आलेली असून तसे पत्रक हि काढण्यात आले आहे.
योध्दा प्रतिष्ठान ने घेतलेल्या आंदोलनाच्या बातमी ची दखल टाइम्स 9 ने घेतली होती,त्यामुळे योध्दा प्रतिष्ठान च्या वतीने टाइम्स 9 चे आभार मानण्यात आले.