महाराष्ट्र

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी १ जुलै रोजी मंत्रालयावर मोर्चामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – दिलीप जाधव

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

राज्यात सत्तावीस हजार ग्रामपंचायत मध्ये विविध पदावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संख्या ६० हजारांच्यावर असुन शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांना अनेकदा वारंवार समक्ष भेटुन निवेदने देण्यात आली आहेत परंतु शासन कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडविणेसाठी शासन उदासीनता दाखवत आहे

ग्रामपंचायत कर्मचारी अतिशय कमी वेतनात काम करीत असून गावातील नागरिकांना लोकोउपयोगी लाईट,स्वच्छता, पाणी, व इतर सेवा ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांना पुरवत आहे तसेच शासनाने अनेक जाहीर केलेला योजना शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे व शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची महत्त्वाची भूमिका ग्रामपंचायत कर्मचारी पार पाडीत असताना देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासन ५०,७५ व १०० टक्के अनुदान देत आहे परंतु हे अनुदान देखील शासन नियमानुसार व वेळेत मिळत नाही सदर हे अनुदान मिळण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आपल्या ग्रामपंचायतीची 90% वसुली करावी लागते परंतु ग्रामसेवक व सरपंच उपसरपंच यांच्या वेतनासाठी कोणतेही वसुलीची करण्याची अट लावण्यात आलेली नाही त्यामुळे अतिशय कमी वेतन घेणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर एका बाजूने शासन अन्याय करीत आहे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद नगरपालिका कर्मचाऱ्यापर्यंत वेतनश्रेणी व पेन्शन मंजूर करावी ,ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला उपदान योजना लागू करावी,कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लावण्यात आलेली वसुलीचे अट रद्द करून शंभर टक्के वेतन सरसकट मिळावे , राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यापासून रखडले आहे तिनही महिन्याचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे , किमान वेतनावरील १९ महिन्याचा मागील फरक मंजूर असताना देखील शासन १९ महिन्याच्या फरकासाठी आवश्यक लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करावा ,

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत वर्ग तीन व चारच्या पदावर दहा टक्के आरक्षण असून दहा टक्के पद भरती जिल्हा परिषदेच्या अनुकंपा धर्तीवर दरवर्षी रिक्त पदाच्या दहा टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात याव्यात, सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत २०२३ च्या जाहिरातीवरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ८६ रिक्त पदे तात्काळ भरावीत या प्रलंबित मागण्यासाठी १ जुलै २०२४ रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा ग्रामपंचायत ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियन यांच्या वतीने काढण्यात येणार आहे अशी माहिती राज्य सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिलीप जाधव यांनी दिलेली आहे तरी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियनच्या वतीने करीत आहे यावेळी राज्याध्यक्ष मोहन लामकाने कार्याध्यक्ष अरुण सुर्वे संतोष दोरकर गुरुबा भोसले बालाजी पवार उमेश पवळ इरेश उंबरजे भगवान कांबळे पांडुरंग खरात इ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button