नाशिक मध्ये दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या षडयंत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी : उत्तरेश्वर कांबळे
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
नाशिकच्या काळाराम मंदीर परिसरात संतापजनक पत्रके काढुन दलित आणि सवर्ण या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा निंदनीय प्रयत्न करण्यात आला आहे .
दोन समाजात फूट पाडण्याचा कुटील डाव असुन महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा हेतू आहे.त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली .
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की त्या संतापजनक पत्रकावर महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली असून काळाराम मंदीर परीसरात दलितांना प्रवेश बंदी ,निळा झेंडा लावण्यास मनाई असल्याचे पत्रक काढून महार, मांग ,चांभार, ढोर आणि समस्त आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
महामानव डाॅ.बाबासाहेब करांनी काळाराम मंदीर प्रवेशाचा सत्याग्रह हा समतेच्या मानवतेचा ऐतिहासिक लढा ठरलेला आहे .त्या पत्रकातील भाषा अंत्यत निंदनीय असुन या पत्रकामागील मुख्य सूत्रधार शोधुन त्याला जेरबंद करावे हा महाराष्ट्र शिव ,शाहू, फुले आंबेडकरांचा आहे .
हिंदूत्ववाद्यांचे , सनातन्यांचे माजुरडे नखरे आम्ही आंबेडकरवादी खपवून घेणार नाहीत .प्रशासनाने सदर प्रकरण गांभीर्यने दखल घेऊन अशा विकृत प्रवृत्ती चा बंदोबस्त करावा अन्यथा वेळ प्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊन प्रत्युत्तर देऊ असा इशारा उत्तरेश्वर कांबळे यांनी निवेदनात दिला आहे यावेळी बलभीम कांबळे, सुखदेव गरड, प्रविणशेठ कांबळे ,राहुल कांबळे ,प्रशांत कांबळे ,पै.सनी भैय्या कांबळे ,युवराज गरड, ओमराजे गरड, पै.प्रेम कांबळे आदी उपस्थित होते