वसईतील शेतकर्यांना बाजारपेठेसाठी 10 एकर जागा उपलब्ध करून देणार…. खासदार राजेंद्र गावित..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640
वसईतील शेतकऱ्यांची पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्रवार दिनांक 13ऑक्टोबर 2023 रोजी कळंब खाडी येथील बाजारपेठेत भेट घेतली. यावेळी कळंब, राजोडी, निर्मळ, भुईगाव, गास आणि वाघोली आदी गावांतील भाजीपाला उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकर्यांनी खासदार गावित यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या. गावित यांनी वसईतील शेतकर्यांना बाजारपेठेसाठी 10 एकर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
वसईचा पश्चिम पट्टा हा बागायती शेतीसाठी ओळखला जातो. वसईतील शेतकरी विविध प्रकारच्या भाज्या, फुले, फळे, तांदूळ आदींचे उत्पादन घेत असतात. मात्र शेतकर्यांना अनेक समस्या भेडसावत असतात. येथील शेतकर्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी स्थायी बाजारपेठ नाही. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. वसईतील शेतकर्यांनी बाजारपेठ मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी खासदार गावित यांच्याकडे केली यावेळी शासनाच्या 20 एकर जागेपैकी 10 एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार पेठेसाठी देण्याची मागणी जिल्हाधिकारी तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करणार असल्याचे आश्वासन खासदार गावित यांनी दिले आहे. या १० एकर जमिनीवर शेतकऱ्यांसाठी सर्व पायाभूत सोयी – सुविधांसहीत अत्याधुनिक बाजारपेठ बनवली जाईल. तसेच पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असे आश्वासन पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

याशिवाय पंतप्रदान किसान मानधन निधी योजना, शेतकरी दाखले, आदींसह विविध योजनांचा लाभ वसईतील शेतकऱ्यांना मिळवून देणार असल्याचे देखील आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी दिले. यासाठी शेतकरी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना गावित यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांना शासकिय योजनांची माहिती मिळेल तसेच सहजपणे लाभ घेता येईल असा विश्वास गावित यांनी व्यक्त केला आहे.



