महाराष्ट्र

तोलनबी शमशुद्दीन मुलाणी यांचे आकस्मित निधन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

इंदापूर तालुक्यातील मुलाणी वस्ती निमसाखर येथील तोलनबी शमशुद्दीन मुलाणी ( वय 73 वर्ष ) यांचे शनिवार दिनांक 14/10/2023 रोजी दुपारी 4:00 वाजता आकस्मित निधन झाले त्यांचे पश्चात 4 मुले,1 मुलगी,4 सुन नातवंडे असा परिवार आहे गेल्या सात आठ महिन्यांपासून त्यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू होते.निमसाखर ता.इंदापूर येथील त्यांच्या राहत्या घरी तोलनबी शमशुद्दीन मुलाणी यांनी अखेरचा श्वास घेतला.

रविवारी सकाळी 10:00 वाजण्याच्या सुमारास मुलाणी वस्ती निमसाखर येथील कब्रस्तान मध्ये त्यांचे दफन विधी करण्यात आले. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तोलनबी शमशुद्दीन मुलाणी यांचा तिसऱ्याचा ( जारत विधी ) मंगळवार दिनांक 17/10/ 2023 रोजी सकाळी आठ वाजता निमसाखर येथील कब्रस्तानमध्ये करण्यात येणार आहे. तोलनबी शमशुद्दीन मुलाणी या अकलूज रिअल इस्टेट एजंट ईन्नुस भाई शमशुद्दीन मुलाणी यांच्या आई होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button