शहर

ओंदे महाविद्यालयात “अर्थशास्त्र विषयातील करिअरच्या संधी” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन.

ठाणे जिल्हा प्रतिनिधी (राजेंद्र भगवान भोईर) टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क .

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओंदे, ता.विक्रमगड येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ विजय शिंदे यांचे अर्थशास्त्र विषयातील करिअरच्या संधी या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अर्थशास्त्र विषयाचे प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील महत्व यावर प्रकाश टाकला.

अर्थशास्त्र या विषयातील असणाऱ्या नौकरी, उद्योग, व्यापार आणि व्यवसाय या मधील संधीचा डॉ विजय शिंदे यांनी सविस्तरपणे आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ चेतना पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आज केवळ अर्थशास्त्र विषयाचा विध्यार्थीच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अर्थशास्त्राचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे नियोजन आणि सुत्रसंचलन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पठाडे आणि प्रा. विपुल तांडेल यांनी केले. कु. अश्विनी पागी हिने सर्व मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button