महाराष्ट्र

शाहीन फाऊंडेशन च्या शिरपेचात मानाचा तुरा…

प्रतिनिधी आमीर मोहळकर

हुतात्मा स्मृती मंदिर येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात सोलापूर येथील आझादी बचाव न्यूज नेटवर्क च्या वर्धापन दिनानिमित्त अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या “शाहीन फाऊंडेशन” ला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,सदर चा पुरस्कार शाहीन फाऊंडेशन चे हाजी उमरभाई (Mराऊंड) यांनी सोलापूर पोलिस उपायुक्त दिपाली काळे मॅडम आणि ज्येष्ठ सरकारी विधीज्ञ डॉ राजपूत साहेब यांच्या हस्ते स्विकारला,यावेळी सोलापूर शहर चे माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि सलीम भाई लोखंडवाला यांच्या सह आझादी बचाव न्यूज नेटवर्क चे अजीज भाई पटेल व्यासपीठावर उपस्थित होते…

या वेळी बोलताना शाहीन फाऊंडेशन चे हाजी उमरभाई (M राऊंड) म्हणाले की या पुरस्काराने “शाहीन फाऊंडेशन” च्या सर्व सदस्यांना एक नविन उभारी मिळेल आणि सामजिक काम करण्याची तळमळ आणखी वाढेल…

पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की गेल्याच वर्षी स्थापन झालेल्या “शाहीन फाऊंडेशन” ने मुस्लिम समाजातील 33 जोडप्यांचे विवाह मोफत करुन वधू वरांना लागणाऱ्या सर्व संसार उपयोगी वस्तू भेट देत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला होता,”शाहीन फाऊंडेशन” ला मिळालेला हा पुरस्कार आपणा सर्वांना आनंददायी ठरो…

26 जाने 2024 रविवार या दिवशी “शाहीन फाऊंडेशन” चा दुसरा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली असून मुस्लिम समाजातील प्रत्येक घटकाने याची नोंद घ्यावी असे “शाहीन फाऊंडेशन” च्या टीम कडून सांगण्यात आले…

सदर विवाह सोहळ्यात नाव नोदणी साठी समीर तांबोळी 9403874342,इब्राहीम शेख 9766105355 यांच्या मोबाईल नंबर संपर्क साधावा अशी माहिती टाइम्स 9 न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button