शहर

8 वर्षाच्या मुलीच्या अंगावर चिमट्याने चटके देणाऱ्या आईवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640

पालघर अल्याळी येथे राहणाऱ्या आईने आपल्या सख्या 8 वर्षाच्या मुलीच्या अंगावर गॅसवर तापवलेल्या चिमट्याने चटके देऊन तिला मारहाण करून क्रूरतेची वागणूक दिल्या प्रकरणी या मुलीच्या आईवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून या मुलीची आई फरार झाली आहे. तिचा पालघर पोलीस कसून शोध घेत आहेत.

पालघर पश्चिमेला असलेल्या अल्याळी हनुमान पाड्याजवळ (33)वर्षीय यादव ही महिला भाड्याने आपल्या कुटुंबासोबत राहते ती मूळची जिल्हा दोहरिया खीरिया उत्तर प्रदेश येथे राहणारी आहे. तिला एक 8 वर्षाची मुलगी आहे ती घरात काम करत नाही याचा मनात राग धरून स्वयंपाक घरातील लोखंडी चिमटा गॅसवर तापवून तिच्या अंगावर चटके देऊन तिला मारहाण करून क्रूरतेची वागणूक देत होती याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी व स्थानिक नगरसेवकांनी या महिलेची तक्रार महिला व बालकल्याण समिती सदस्य यांच्याकडे केली होती

त्यांच्या आदेशान्वये पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट देऊन महिला व बालकल्याण समिती यांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर योग्य उपचार करून पालघर प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी या मुलीच्या आईवर सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी पालघर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button