शहर

सौ.साखरबाई सोपान देशमुख यांचे आकस्मित निधन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज दिनांक 09/10/2023 : माळशिरस तालुक्यातील देशमुख वस्ती,६१ फाटा येथील सौ.साखरबाई सोपान देशमुख (वय 67 वर्षे) यांचे रविवार दिनांक 08/10/2023 रोजी रात्री 11:50 वा.आकस्मित निधन झाले. त्यांचे पश्चात पती, 2 मुले, 1 मुलगी, 1सुन, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या दहा दिवसापासून त्यांचे वर माळशिरस येथील खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. रविवारी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना सौ.साखरबाई देशमुख यांनी अखेरचा श्वास घेतला.

सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास 61 फाटा माळशिरस येथे त्यांच्या मृतदेहावर अंतिम अग्नीसंस्कार करण्यात आले. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या.त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कै.सौ. साखरबाई सोपान देशमुख यांचा तिसऱ्याचा (अस्थी सावडण्याचा) विधी मंगळवार दिनांक 10/10/2023 रोजी सकाळी सात वाजता होऊन, दशक्रिया विधी अकलाई घाट अकलूज येथे सकाळी दहा वाजता करण्यात आला.कै.सौ. साखरबाई सोपान देशमुख या साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता, aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्या भगिनी होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button