महाराष्ट्र

मुस्लिम समन्वय समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नौशाद मुलाणी यांची निवड

प्रतिनिधी.. रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो.99 21 500 780

अकलूज : महाराष्ट्र राज्य मुस्लिम समन्वय समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी टाईम्स 9 मराठी न्युज चे संपादक नौशादभाई मुलाणी, यांची निवड विश्रामगृह अकलूज येथे पार पडली सदरची निवड प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांनी केली. सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यामध्ये मुस्लिम समन्वय समितीचा निवडीचा झंझावात सध्या जोरात सुरु आहे.

सोलापूर जिल्ह्यातून विविध तालुक्यातून मुस्लिम समन्वय समितीची वाढती संघटनात्मक बांधणीतून सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक हितार्थ मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडत आहेत मुस्लिम समाजातील मागासलेपणा दूर करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी कार्य करणे हेच या समन्वय समितीचे मुख्य उद्देश आणि याच उद्देशाला अनुसरून नौशाद मुलाणी यांची पत्रकारिता सामाजिक क्षेत्रातील योगदान, गुणवत्ता व कार्यक्षमता पाहून त्यांची सोलापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांशी असणारे हितसंबंध अनेक लोकांशी मनमोकळेपणाने बोलणे त्यांच्याशी असणारी जवळीक पाहता आणि यांचा जनसंपर्काचा फायदा भविष्यात मुस्लिम समन्वय समितीला नक्की होईल म्हणून मुस्लिम समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद भाई शेख यांनी एक मतांनी निवड केली

यावेळी जिल्हा,तालुका व गावनिहाय पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील करण्यात आल्या, तालुका सहसंघटक पदी मिराज तांबोळी, यशवंत नगर अध्यक्षपदी इमरान शेख, खंडाळी अध्यक्ष पदी जावेद तांबोळी, उपाध्यक्ष पदी इक्बाल शेख, यांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष रशीद भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका अध्यक्ष सलीमभाई मुलाणी यांनी केल्या,

सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकिय विकास साधण्याकरता समितीचे ध्येय धोरण असल्याचे मोहसिन शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना थोडक्यात सांगितले. फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारास प्रेरित होऊन विविधतेत एकता निर्माण करून विविध सामाजिक प्रश्न शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून सोडवणे हाच महत्त्वाकांक्षी उद्देश असल्याचे समितीचे प्रवक्ता रियाज मुजावर यांनी मत व्यक्त केले. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा समितीकडून सत्कार करताना ॲड दादासाहेब पांढरे पाटील, नगरसेवक कैलास वामन, रियाज मुजावर, मोहसिन शेख, अकलूज शहराध्यक्ष समिरभाई काझी, फारुक शेख, माळशिरस शहर अध्यक्ष समीरभाई मुलाणी, पत्रकार रियाज मुलाणी,सुरज पठाण, शाहरुख शेख , सोहेल शेख, सद्दाम पठाण, अन्सार पठाण, आयान तांबोळीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button