उपसभापती प्रदीप वाघ यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील पळसुंडे क्रिडागंणात केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.
जिल्ह्यातील जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा पळसुंडेच्या क्रिडागंणात केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून प्रदीप वाघ उपसभापती उपस्थित होते. त्यांनी मुलांना शुभेच्छा देताना सांगितले की शिक्षणा बरोबरच क्रीडा व कला क्षेत्रा कडे देखील लक्ष दिले पाहिजे भविष्यात आपल्या मधुन अनेक खेळाडू व कलाकार निर्माण झाले पाहिजेत अशी अपेक्षा वाघ यांनी व्यक्त केली.
त्याबरोबर आदिवासी विकास विभाग विद्यार्थींना क्रीडा स्पर्धा आयोजित करुन संधी निर्माण करुन देत असल्याची बाब चांगली आहे असे हि ते यावेळी म्हणाले.
जव्हार प्रकल्प अंतर्गत 12 शाळा मधील जवळपास 850 विद्यार्थ्यांनी या केंद्र स्तरिय स्पर्धेत सहभाग घेतला असुन पळसुंडे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राठोड शेवाळे सर व क्रीडा स्पर्धा आयोजन समिती ने भव्य दिव्य स्वरुपाचे आयोजन केले आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला प्रदीप वाघ उपसभापती, प्रमिल वांगड सरपंच, कविता पाटील पोलिस पाटील, नंदकुमार वाघ उपसरपंच, दिलीप बोढेरे, प्रदीप वारघडे, रघुनाथ पाटील, जगन्नाथ पाटील प्रकल्प कार्यालयाचे निरिक्षक प्रकाश चव्हाण व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



