डहाणू वाघाडी येथे सभापती संदेश ढोणे यांच्या हस्ते भोजनालय इमारतीचे उद्घाटन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
जिल्हा परिषद शाळा वाघाडी डहाणू येथे हिंदुस्थान इकोसॉफ्ट या संस्थेमार्फत शाळेतील मुलांना जेवणासाठी भोजनालय इमारत बांधून देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदेश अशोक ढोणे सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद पालघर यांच्या हस्ते लाल फित कापून इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न होऊन लोकार्पण करण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी सभापती संदेश ढोणे यांच्याच हस्ते सदर कामाचे भुमिपूजन करण्यात आले होते.
अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांनी ज्या ठिकाणी आवश्यकता असेल अशा ठिकाणी विद्यार्थी, रुग्ण, महिला व इतर समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासंदर्भात उपक्रम राबवावेत असे आवाहन यावेळी सभापती संदेश ढोणे यांनी केले.
सदर इमारत ज्या जागी बांधावयाची होती त्या ठिकाणी असलेली जुनी जीर्ण इमारत निर्लेखित करणे आवश्यक होते यावेळी बांधकाम सभापती यांनी सदरच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देऊन निर्लेखन करण्यास मोलाचे योगदान दिले. त्यामुळेच सदरची इमारत तात्काळ बांधून घेऊ शकलो असे सांगून स्नेहलता सातवी यांनी सभापतींचे आभार व्यक्त केले. तसेच सुसज्ज इमारत बांधून दिल्याबद्दल सर्व मान्यवरांनी हिंदुस्थान इकोसॉफ्ट संस्थचे आभार व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती पंचायत समिती डहाणू स्नेहलता सातवी, माजी समाजकल्यान सभापती, जिल्हा परिषद ठाणे बेलकर , सरपंच वाघाडी प्रशांत सातवी, उपसरपंच जितेंद्र कोल्हा, माजी सरपंच दिलीप सातवी, माजी उपसरंच यशवंत मेढा, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सदस्य संदिप दळवी, जिजाऊ संघटना जिल्हाध्यक्ष, जावेद शेख, व डहाणू विधानसभा अध्यक्ष कल्पेश भावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



