महाराष्ट्र

डहाणू येथील सचिन तांडेल यांची राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेसाठी निवड

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

सावळाराम महाराज क्रीडा संकुलन डोंबिवली पॅरा ऑलम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 8 ऑक्टोंबर 2023 रोजी 15 वी पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2023-24 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडू सचिन हरिश्चंद्र तांडेल यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्विमिंग स्पर्धेत निवड करण्यात आली आहे .

या 15 व्या पॅरा राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत सहभाग घेऊन त्याने 100 मीटर बटरफ्लाय आणि 100 मीटर बॅग स्ट्रोक या स्विमिंग जलतरण पोहणे क्रीडा प्रकारात दोन पदके मिळवून तृतीय क्रमांक पटकावून उत्तमरीत्या कामगिरी केली आहे . सचिन तांडेल यांना स्विमिंग क्षेत्रात उत्तम रित्या धडे शिकवणारे NIS प्रशिक्षक रवींद्र सकपाळ यांनी मार्गदर्शन केले आहे . पॅरा ऑलम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष कैलाश घाणेकर यांनी 15 व्या पॅरा दिव्यांग स्विमिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहकार्य केले. व मौलाचे मार्गदर्शन केले .

दिव्यांग खेळाडू सचिन हरिश्चंद्र तांडेल यांना 1 मे 2023 रोजी पालघर जिल्ह्यातील एक पॅरा दिव्यांग जलतरणपटू गुणवंत खेळाडू म्हणून शासनाकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . सचिन तांडेल हा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील नरपड गावात राहत असून तो मच्छिमार मांगेला समाजाचा असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती कमकूवत असल्याने तो आपल्या व्यवसाय करून स्विमिंग फुल क्षेत्रात सरावासाठी विरार महानगरपालिका फुलपाडा येथे तो रोज सराव करतो

दिव्यांग असून त्यांने आपल्या कठीण परिस्थितीवर मात करून अतिशय जिद्दीने संपूर्ण वर्ष भर मेहनत करून पालघर जिल्हा व डहाणू तालुकांचे नाव उज्ज्वल केले आहे . पॅरा ऑलम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन पालघर जिल्हा यांच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले असून संपूर्ण पालघर जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button