महाराष्ट्र

पालघर येथे मर्मबंध साहित्य व कला संस्था आयोजित मर्मबंध काव्यरंग आणि काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 .

मर्मबंध साहित्य व कला संस्था आयोजित मर्मबंध काव्यतरंग आणि काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा जिल्हा ग्रंथालय कार्यालय पालघर येथे रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी मोठ्या उत्साहात भरघोस रसिक श्रोत्याचा उपस्थितीत पार पडला.

कविता स्पर्धेत 30 स्पर्धकानी भाग घेतला. प्रथम बक्षिस साक्षी धवडेकर,द्वितीय हर्षित चुरी,तृतीय पांडेजी आणि प्रोत्साहनपर सुजित संखे व महेंद्र रामचंद्र पाटील याना मान्यवराचा हस्ते देण्यात आली.

दुसऱ्या सत्रात जेष्ठ कवयित्री रत्नप्रभा किसन दवंगे लिखित साद अंतर्मनाची या कविता संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घरत यांच्या हस्ते झाले.यावेळी मर्मबंधच्या अध्यक्षा नम्रता पाटील ,उपाध्यक्ष-मनिष संखे,कवयित्री स्मिता पाटील,प्रकाशक प्रतिनिधी साहित्यिक लेखक संजय पाटील मायखोपकर ,अनुपमा ठाकुर,अनिल करवीर,सुहास राऊत,कवयित्री रत्नप्रभाची लेक सुधाताई अशोक आभाळे हे मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत मधुमती कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी यशस्वी नियोजन करणारे कार्यकारिणी सदस्य भालचंद्र पाटील,मोहन वायकोळे,नितेश पाटील,वृंदा कुलकर्णी ,पंडीत पाटील,संगिता पाटील,प्रिती भोईर,शबाना व्हिटर ,शिल्पा करवीर व आभाळे परिवार उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button