करमाळा तालुक्यात पुनर्वसन कामासाठी 3 कोटी 22 लाख रुपयाचा निधी मंजूर,माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी अलीमशेख मोबाईल 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यात पुनर्वसन कामासाठी 3 कोटी 22 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक विस्ताराने माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील 30 गावांनी उजनी धरणाच्या निर्मितीसाठी त्याग केला असल्याने या गावांचे पुनर्वसन 18 मूलभूत नागरी सुविधा देऊन केले गेले नाही.
यामुळे आपण सतत या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले व 21 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली व सन 2014 पासून सतत पाठपुरावा केला. यातील बहुतांश कामांसाठी निधी मंजूर झाला व कामे सुध्दा सुरू झाली आहेत. आता यातील 3 कोटी 22 लाख 3 हजार 649 रुपये आणखी मंजूर झाले आहेत. या कामांना (शासन निर्णय आदेश – अर्थ स 23/प्र क्र 70/र 8 व अर्थ स 23/ प्र क्र 71/र 8 ) नुसार मंजुरीचे अंतरिम आदेश देण्यात आलेले आहेत.
या निधीतून रिटेवाडी येथील शाळा संरक्षण भिंत (प्र मा. रक्कम 13 लक्ष 25 हजार 115 रू मधील पूर्ण रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. गाव पोहच रस्ता डांबरीकरण (सा. क्र 0/७० ते 1/००) प्र मा रक्कम 1,63,10,100 रू पैकी 21 लाख 5 हजार रु वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच पोहच रस्ता डांबरीकरण (सा. क्र 1/00 ते 1/575) प्र मा रक्कम 6755100 रू पैकी 20 लाख 45 हजार रु वितरीत करण्यात येणार आहेत. तर भिवरवाडी येथील अंतर्गत खडीकरण रस्ते कामासाठी प्र मा 41,11,575 पैकी सर्व रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. ढोकरी येथील अंतर्गत खडीकरण रस्ते कामासाठी प्र म 37,01760 पैकी सर्व रक्कम वितरीत वितरीत करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे 3 कोटी 22 लाख 3 हजार 649 रुपये मंजुर झाले आहेत. पुनर्वसन कामांना गती देऊन सर्वच मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत. आजही पुनर्वसित गावांना स्मशानभूमी, तिथं पर्यंतचा पोहोच रस्ता, गावातील शाळांसाठी वर्ग खोली, गाव अंतर्गत भक्कम रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा तसेच वीज व आरोग्य सुविधा पूर्ण प्रमाणात मिळालेल्या नाहीत. 2014 पासून सतत पाठपुरावा चालू ठेवल्याने अनेक दशके रखडलेला व दुर्लक्ष्य झालेला 30 गावास महत्वाचा वाटणारा प्रश्न सोडवण्यात आपणास यश आले. आगामी काळातही पुनर्वसित गावांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.



